विकास आंधळा आहे! ः(
वातावरण चांगलं असलं की मित्र -परिवारापैकी कोणीही कळवतं आज वातावरण भारी आहे बाहेर पडा. मी ही सवयीनुसार लगेचंच बाहेर पडतो.
आज सकाळी 6 ला Amit चा फोन झाला, मीबाहेर पाहीलं, कुठे जायचं ठरवुन लगेचच गाडी काढुन रस्त्याला लागलो. कुठल्या वातावरणात काय फोटो काढायचे याचे आराखडे डोक्यात तयार असतात.
ठरलं अस्वली स्टेशन पासुन साकुर गावापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा ईंग्रजकाळीन वा फार जुनी वडाची झाडं आहेत तिथं फोटो काढुयात. मस्त दुतर्फा वडाची झाडं त्यांची तयार होणारी हिरवी कमाण अस ते द्रुश्य: आता ईतिहासात जमा झालंय.
पोहचलो तर बघतो तर काय त्यातली बरीच वडाची झाडं तुटलेली. बरं त्यातली सगळी झाड विनाकारण कापलेली कारण ना तो रस्ता रुंद झालाय, ना अजुन पाच दहा वर्ष होईल. व दोन झाडं तर कोणत्याही परीस्थीतीत कापायची गरज नसतांना कापलीयेत. ते फोटो पाहील्यानंतर लक्षात येईलच. नक्की ठिकाण अस्वली रेल्वे फाटकापासुन पुढे नांदगाव बु. मध्ये नदीवर एक जुना पुल मोठा केलाय त्याच्या जवळ ही झाडं विनाकारण सो कॉल्ड विकासाला बळी देलीयेत.
सरकारी अधिकारी वा त्यांचे कंत्राटदार कोणता गांजा ओढुन काम करतात माहीत नाही फारच कडक आहे तो. 7-8 फुटाचा घेर असलेली झाडं ह्यांच्या ऊभ्या हयातीत वाढु शकत नाहीत आणि अशी झाडं हे लोक निर्दयीपणे एका दिवसात कापुन टाकतात हे कसली तरी नशा केल्याशिवाय घडु शकत नाही.
म्हणतात ना “अब दिल्ली दुर नही!”
ह्या वाक्याप्रमाणे संपुर्ण भारतात दिल्लीसद्रुष्य परीस्थिती लवकरच होईल ह्यात शंका नाही.
ज्या आनंदात मी गेलो होतो त्यापेक्षा किती तरी जास्त उद्विग्न मनाने परत माघारी फिरलो.
प्रविण अस्वले.
9 सप्टेबर 2019.
#savetreees #trees #treecut #maharashtra #Nashik



Like this:
Like Loading...