बहीण भाऊ

Edge of Sahyadri

आमच्या गावात आल्यावर हे शहरी लोक आमचे फोटो का काढतात? हा प्रश्न लहाना-मोठ्या सगळ्यांनाच पडतो, आजकालची मुलं तर फारच चौकस.
त्यांना आपलं कुतुहल, आपल्याला त्यांचं कौतुक.

सह्याद्रीच्या दुर्गम भागात घरांच्या रचना बदलायला लागल्या, हळु हळु गावं आधुनिक व्हायला लागली, शेणामातीची सारवनं जाऊन फारशा आल्या. धरणं बांधण्यात विस्थापित गावांचे पुनर्वसन झालेल्या ठिकाणी हे प्रमाण जास्त दिसते. स्वातंत्र्य मिळाल्यापासुन ही प्रक्रीया सुरु आहे.

काल घाटघरला गेलेलो, तिथुन पुढे एका सिक्रेट लोकेशनला कोजागिरी पौर्णिमेचे दुध व मुक्कामाचे नियोजन व पुढे आम्हाला प्राचीन काळभोर दरा घाटातुन खाली जांमुडे गावात ऊतरायचे नियाेजन होते. दरम्यान काही छायाचित्रं मोबाईलात काढले, त्यापैकी हा एक.

#edgeofsahyadri #pravinaswale #sahyadri #kids #peopleofsahyadri #trek

Leave a comment