“Mango Tree”
“अांब्याचं झाड!”
लहानपणापासुनच अांब्याचं झाड म्हणजे अाम्ही सगळ्या भावंडांना प्रियच. दारासमोर एकच होतं ते मी चौथीत असतांना विजमंडळाला बळी पडलं, त्याकाळात अंडरग्राऊंड नव्हत्याच तारा. बाकी अामच्या माळावर मात्र मस्त अामराई होती, मध्ये विहीर त्यामागे एक आंबा, दोनतीन बाभळी, विहीरींसमोर थारोळं बाजुला पाण्याचा अाहाळ, थारोळ्यासमोर मोटेची धाव, तिच्या दोन्ही बाजुला अांब्याची सात अाठ मोठी झाड, एक सिताफळ (अाजकालची पोरं त्याला कस्टर्ड अॅपल म्हणतां) ती अजुन अाहे, जांभुळ व एक बेलाचं झाड असा सगळा पसारां एैसपैस. त्यापैकी एक अांबा न झालेल्या रस्त्याला बळी गेला. अजोबा होते तोपर्यंत मस्त मोटेवरच्या गाण्यांवर अामचा खेळ रंगत असे. उन्हाळयात मस्त कैर्या, पिकलेल्या शाका, अांबेसंपेस्तावर जाभळं तयार असायची दिमतीला. जांभुळ मात्र दोन अांब्याच्या मध्येच होती सरळ उंच वाढलेली ती सर करनं काही जमायचं नाही मग अांब्याच्या झाडांवरुन तिकडे जायचं त्यातही एक गंमत होती. दुपारी मस्त सुरपांरब्यांचा डाव रंगत असे, त्यात एकदा हातही मोडून घेतलेला मी, अांब्यावरुन खाली उडी मारतांना. दुपारी मस्त सावली असायची खेळायला व झोपायला मात्र अजोबा होते तोपर्यंत दुपारी गडबड गोंधळ कमी करावा लागायचा व एक अावर्जुन ते असेपर्यंत एक कैरी चोरी जायची नाही त्यांचा राबताही होता व दराराही. पुढे अाजोबा गेले, मोट बंद झाली. कैर्याही चोरी व्हायला लागल्या मग अांब्याच्या राखणीला रोज दुपारी शाळेतून घरी अाले की सगळी पोरं माळावर कैर्या पाडायला व राखायलाही. मग हळु हळु विहीरीत पोहायला शिकायचा चस्का लागला सगळ्यांना, घरचे रागवायचे मग चोरून कोणीही एकजण चर्हाट (रोप) घेऊन माळावर पोचायचा मग हळुवार बाकीचे यायचे, मग चर्हाटाचं एक टोक कंबरेला व दुसरं किर्लोस्कर डिजल पंपाला बांधायचे व नीट पाण्यात ऊडी, असं करुन अाम्ही सगळे पोहायला शिकलो. सुरुवातीला एकदा हिवाळ्यात पाण्यात इतका गारठलो की बाकीच्यांनी मला चर्हाटाला बांधुन विहीरीबाहेर अोढुन काढला. नंतर मग मात्र खोलात खोल विहीरीतही माझी उडी सरळ मध्यभागातच जायची, व कोणी माझ्याशी बरोबरीही करायचं नाही.
हे अांब्याच झाड मात्र बरच लांबचं धरापासणं पन्नासएक किलोमीटर, पण ह्याचा अाकारांन मला भुरळच घातली, अगदी पहील्यांदाच दिवसापासणं. प्रत्येक वेळेला त्याच्याजवळुन जातांना “एक फोटो तो बनतां है!” असच ह्याचं रुप मला भावलेलं. कधी सुर्यास्त असो किंवा मागे ढगाळ अाकाश मी ह्याच दर्शण घेतल्याशिवाय पुढे नाही जाणार.
ह्यावेळेला मात्र हौसच पुर्ण केली, कोण मिळतय का जोडी? नाही कोणीच रिकामे नाही, मुकेश तयार झाला, पण मुक्कामाला नाही येणार रात्री परत येणार असला तर येतो म्हणाला, सकाळी ॲाफिस अाहे, म्हटलं चल. रात्री दहाला पोचलो, बारापर्यंत फोटो काढुन रात्री दिडला घरी पोहचलो. दुसर्यादिवशीही तो फोटोग्राफीचा कैफ काही गेलेला नव्हता, मग काम अटोपता करता मलाही पाच वाजले स्टुडिओत, मग स्टुडिओतुन सरळ लोकेशनवर एकटाच दिमतीला फियाट, फक्त संतोषला सांगुन ठेवले कुठे मुक्काम अाहे ते बास. पोचतां करता सात वाजले अाधल्या दिवशी भेटलेला गोरख जाधव, म्हणजे अाम्ही अजुन दुसर्या झाडाचे फोटो काढत होतो, तिथं जवळच्या वावरात हा पठ्ठया रहात होता, अामची वट वट व गाडीची अावाज एैकुण अंधारातच पाय अापटत अाला, मीही दोन मिनिटं स्तब्ध झालो चोर तर नाहीतना, मग मी लांबूनच अावाज दिला राम राम पाव्हणं तेव्हा तोही सावरला व म्हणाला हा पाव्हणं हायेत व्हय! तोही संशयित होता अामच्याबाबत, मग सांगायलाच लागला राणावनात जागसुद राहावं लागतं, काल परवा शेजारी कोणाची जनावरं सोडुन नेली होती. मग कुठले पाव्हणे काय ही इचारपुस झाल्यावर अाम्हालाही धीर अाला, मग मी त्याला म्हटलं चल अापण वरच्या अांब्यापर्यंत जाउन येऊ, तिथल्या असल्याने चटकन त्याला झाडाची अोळख पटली व अामच्याबरोबर अाला.
तर परत त्या गोरखच्या घराजवळ गाडी थांबवील तसा तो पळतच अाला, मी इकडचं अाहे मग त्याला विचारले राहशील कारे मला जोडी ह्या अांब्याजवळ तर नाही घरी थांबावं लागल पोरंसोरं, जनावर हायत गोठ्यात. बरं चल जरावेळ मग अाला माझा कॅमेरा सेट होइस्तोवर थांबला, माझे सेटींग होत नाही तोवर दोन मोटारसायकली येउन थांबल्या हे “फॅारेस्ट” व्हते “वळु” चित्रपटातले नाही हो हे खरेखुरे फॅरेस्टवाले होते. त्यानीही नीट चौकशी करुण घेतली काय करु राहीले मग अायपॅडवर पाच दहा फोटो पाहील्यावर मग साहेब मोकळे झाले, अाताच सेफटी घेऊन अाला म्हणलें.
(सेफटी म्हणजे खाजगी जागेलगत असलेल्या वनजमीनीच्या सुरुवातीला क्रुत्रीम वनवा पेटवून गवत कमी करतात म्हणजे शेजारच्याने शेत जाळले तरी वन सुरक्षित राहते त्याला हे सेफटी घेणं म्हणतात)
नविन पिढीच्या व इंग्रजाळलेल्या लोकांसाठी शब्दसुची
मोट: एक मोठी चामड्याची पाण्याची पिशवी, ट्रकच्या चाकाएव्डी, विहीरीतही पाणी काढायला वापरायचे.
चर्हाट : दोरखंड, दोरी, थारोळं: विहीरीसमोर विहीरीतुन काढलेले पाणी साडंवण्यासाठी केलेला मोठा ” ट्रे” सिंमेट दगड वापरुन साधारण ७x७फुटाचा
Like this:
Like Loading...
You must be logged in to post a comment.