कळसुबाई, अलंग, मदन, कुरंग रांग! एकुणच सह्याद्रीच्या रौद्र व अतिशय सुंदर रुपामधले एक मानाचे पान! फावल्या वेळात काय करायचे हा प्रश्न आता पडतच नाही, पावलं आपोआप सह्याद्री फिरवुन आणतात, मग वेळेनुसार कधी फक्त रॅा आॅफ रोड ड्राईव्ह असतं, किंवा सह्यकुशीत मित्रांसोबत केलेली कॅंपींग असतं! नाहीतर गडमाथ्यावर अनुभवलेला वार्याचा थरार असतो! अशाच एका रम्य हिरव्याकंच संध्याकाळी पॅलीओ घेऊन मी, चेतन थोरात, चेतन चव्हाण मांजरगाव शिवारात पोचलो! ऊन सगळ्या रस्त्यांनं मला हुलकावणी देत होतं, ढग मस्त डोंगरांच्या अंगाखांद्यावर खेळून हळुवारपणे पुढे सरकत होते! मंद गार वारा अंगाला झोंबुन वेड लावत पुढे निघत होता! !