दत्तोबा!
अापण दत्तोबांसारखे नशीबवान! अाकाशातल्या मुक्त ढगांच्या रंगांचा कॅनव्हास व चांदण्यांचा सहवास नेहमीच बघावयास योग्य जागी योग्य वेळी असण्याची भाग्य लाभलयं! लाखो रुपये मिळतील म्हणुन मनाविरुध्द, एथिक्स सोडुन काम करण नाही जमत, जमनारही नाही. बर्याच लोकांना हे रंग खोटे असल्याचा भास होतो! हो खरच काही लोकांना विश्वासच बसत नाही हे असं दिसतं निसर्गात, कारण डोळे वर करुन अाकाशाकडे बघायला वेळच नसतो, कारण त्यांच जगणं मुळात स्वतंसाठी नसतच, ह्या चंगळवादी जगात ते गहाण असतं वित्तसंस्थांकडे! प्रदुषन, वातावरणातील धुळ, हवेतील अाद्रता ह्या सगळ्यांचा योग्य समतोल असला की अापला पिक्चर पाणचट हिंदी सिनेमापेक्षा भारी होणारं हा विश्वास ठासुन अाहे अापल्यात!
तिरढ्यातले दत्तोबा भेटले, काय करतोय हे सागीतल्यावर काल याहीपेक्षा भारी होतं म्हटले.
दत्तोबा गायी घेऊन निघालेत, २०-२५ गायी, एक पिशवीभर सामान खाली घाट उतरुन कडव्याच्या खोर्यात चार महीणे काढणार, वर डोंगर माथ्यावर गायींना चारा, पाणी नाही म्हणुन भटकंती. परिसरातील बिबट्याची भीती नाही की चेहर्यावर निराशा नाही, डोळ्यात प्रचंड समाधान व अाशावाद! ते नेहमीच अनुभवत असलेल्या भन्नाट कॅनव्हासमध्ये त्यांनाही सामावण्याचा मोह मला अावरला नाही.
#दत्तोबा #wanderlust #landscape #environment #pravinaswale #sahyadri#dusk #clouds #portrait